बारामतीत जरांगे पाटील यांची तोफ धडाडणार

बारामती : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करून राज्य सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील यांची तोफ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत धडाडणार आहे, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवार दि 20 अक्टोबर रोजी बारामतीत मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
बारामती येथील नगरपालिकेच्या समोरील तीन हत्ती चौकात दुपारी 4 वाजता या विराट सभेचे, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य भर पेटलेला आहे, आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असताना जरांगे पाटलांची बारामती मधील सभा निर्णायक ठरणार असुन जरांगे पाटील बारामतीत नेमके काय बोलणार याची उत्सुक्ता सर्वांनाच लागली आहे.