October 24, 2025

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बंदचा इशारा

IMG_20231016_181408
बारामती : नगरपालिकेत काम करत असलेल्या ठेकेदार नियुक्त कंत्राटी कामगारांना कामगार नियमाप्रमाणे सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिकेवर  वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने कंत्राटी कामगारांचे आंदोलन करून निवेदन देण्यात आले तसेच वेळेत सुविधा न दिल्यास आंदोलन तीव्र करून बारामती बंदची हाक दिली जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.
बारामती नगर परिषदमध्ये एन. डी. के. या ठेकेदाराकडे सफाई काम करणाऱ्या कंत्राटी कामगार उषा भोसले यांचा काम करत असताना अपघात होऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहेत, सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत, मात्र, त्यांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर असे समोर आले कि, या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य विमा काढले जात नाहीत, त्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार देखील दिले जात नाहीत तसेच पगार वेळेवर दिला जात नाही त्यांचा भविष्य निर्वाह निधी भरला जात नाही त्यांना सेफ्टी किट दिल जात नाही,  त्यांना कामावर असताना तात्काळ आरोग्य सुविधा दिल्या जात नाहीत त्यामुळे अपघात झाल्यानंतर उपचार करण्यासाठी त्यांच्यावर आर्थिक संकट येते, काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी महेश रोकडे यांना यांना या कंत्राटी किमान वेतन प्रमाणे पगार वेळेवरती करावा तसेच सर्व कामगारांचा आरोग्य विमा काढावेत त्यांचा भविष्य निर्वाह निधी वेळेवरती भरावा, सेफ्टी कीट देण्यात यावे त्यांना आरोग्य सुविधा देण्यात यावे तसेच रस्त्यावरती काम करत असताना त्यांच्या सेफ्टी साठी उपाययोजना राबवण्यात याव्यात असे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आले. या वेळी निकाळजे यांनी वरील सर्व मागण्या वर जर येत्या सात दिवसांमध्ये नगर पालिकेने निर्णय घेतला नाही किंवा तशा प्रकारच्या उपाय योजना राबवल्या नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून बारामती बंदचा इशारा दिला यावेळी तालुका अध्यक्ष रामदास जगताप, तालुका संघटक आनंद जाधव, शहर उपाध्यक्ष जितेंद्र कवडे, शहर सचिव विनय दामोदरे, प्रबुद्ध नगर शाखा अध्यक्ष आदेश निकाळजे, शाखा उपाध्यक्ष बंटी डिकळे, बंटी सोनव,णे कृष्णा साळुंके व कंत्राटी काम करणाऱ्या बहुसंख्या महिला उपस्थित होत्या.
एन. डी. के. या ठेकेदाराबाबत यापूर्वी देखील कर्मचारी यांच्यावतीने आंदोलने तसेच तक्रारी दिल्या आहेत मात्र नगरपालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित ठेकेदाराला वारंवार पाठीशी घातले जात असल्याची चर्चा आहे.

You may have missed

error: Content is protected !!