बारामतीतील ॲकॅडमी नावाचा शिक्षणाचा धंदा होणार बंद !

बारामती : बारामती आणि परिसरात बेकायादा व बोगस सुरु असलेल्या ॲकॅडमी लवकरच बंद होणार असून ज्या ॲकॅडमी इमारतीचे फायर ऑडिट केले नाही त्यांना बंद करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी नगरपालिकेचे फायर अधिकारी यांना दिल्या.एकूणच बारामती आणि परिसरात सुरु असलेला हा शिक्षणाचा गोरख धंदा बंद होणार हे मात्र नक्की झाले.
सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय भवन येथील तहसील कार्यालयात बारामतीतील प्रशासकीय अधिकारी यांची ॲकॅडमी संदर्भाने मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी निर्णय घेण्यात आला. यावेळी तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी गणेश शिंदे यांच्या वतीने नायब तहसीलदार विलास करे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, गटविकास अधिकारी अनिल बागल, गटशिक्षण अधिकारी संपत गावडे, नगरपालिकेचे फायर अधिकारी पी.कुल्लरवार तसेच इतर विभागाचे अधिकारी व तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण व पत्रकार उपस्थित होते.
ज्या ॲकॅडमीचे फायर सेफ्टी ऑडिटच केले नाही आणि ज्यांना फायर सेफ्टी ऑडिटच्या नोटीसा देवूनही फायर सेफ्टी ऑडिटच केले नाही अश्या ॲकॅडमी बंद करण्यात याव्या अशा सूचना दिल्या आहेत तसेच ज्यांच्या ॲकॅडमीचे शिक्षण कायद्यानुसार शासकीय नियमानुसार इमारातींचे ऑडिट केले नाही अश्या ॲकॅडमी बंद करण्याच्या सूचना नायब तहसीलदार करे यांनी दिल्या आहेत. तसेच ज्या ॲकॅडमी चालकांच्या बेकायदा बस चालू आहेत त्यांच्यावर कारवाई केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी सांगितले तर इतर शाळेच्या नावाने नोंद असलेल्या मात्र ॲकॅडमीच्या परिसरात असलेल्ता आणि ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसवर भविष्यात तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल असेही ठरले त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागाला या संदर्भाने पत्र पाठ्विण्याबाबातची देखील चर्चा झाली जे ॲकॅडमी चालक शासकीय नियम आणि शासकीय कर चुकवितात त्यांच्यावर शासकीय नियमाने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.