खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक
बारामती : अंडा भुर्जी वाल्याने अंडे फुकट न दिल्याच्या कारणावरून मारहाण करून खून केल्या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी प्रवीण भानुदास मोरे ( वय ३६ वर्षे रा. कल्याणीनगर तांदूळवाडी, बारामती ) याला अटक केली आहे.
येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय नजीक अंडाभुर्जी विकणारे शाबाज रौफ पठाण ( वय 32 वर्षे रा. सद्गुरूनगर, बारामती ) यास 30 सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात इसमाने गंभीर मारहाण करून जखमी केल्या बाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र उपचारादरम्यान शाहबाज याचे बारामतीतील खाजगी दावाखान्यात निधन झाले. पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी शोध घेण्यासाठी पोलिस पथके तयार करून गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस अमलदार दशरथ इंगोले व अक्षय सीताप यांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे तपासकरून शाहबाज पठाण यास दारूच्या नशेत फुकट अंडी देण्याबाबत वाद घातला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर प्रवीण भानुदास मोरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाश पवार, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस अंमलदार रामचंद्र शिंदे, अभिजित कांबळे, दशरथ इंगोले, अक्षय सीताप, दादा जाधव, सागर जामदार, शाहु राणे यांनी तपास केला.
