October 24, 2025

पती-पत्नीच्या वादात पत्नीने पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न  

istockphoto-1327513625-612x612

Big domineering angry wife woman scolding husband man lying on floor. Family couple persons characters quarrelling arguing. Fight conflict, overbearing wife relationship problem concept flat style vector isolated illustration

बारामती :  पती-पत्नीच्या वादात चक्क पत्नीने पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील मौजे पारवडी येथे घडल्याचे समोर आले आहे.
पती-पत्नीच्या भांडणात पत्नीने चक्क पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पती ४० टक्के भाजला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत,  तर या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा दांपत्यामध्ये काहीतरी कारणावरून सतत वाद सुरु असतात,  याच वादाच्या कारणावरून पत्नीने मंगळवारी पहाटेच्या सुमारास पतीला जीवे मारण्याच्या उद्देशाने पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकले, त्यामध्ये पतीच्या तोंडासह, छाती, पोट, गुप्तांग आणि पाठीकडील भाग आसा ४० टक्के भाजला आहे. यातच भर म्हणून पत्नीने उकळते पाणी टाकल्यावर तुला आता जिवंतच सोडणार नाही, असे म्हणत,  लोखंडी पाईपने मारहाण देखील केली आहे. या प्रकरणी पतीने पत्नीच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!