October 24, 2025

अवजड वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी

IMG-20231010-WA0049
बारामती : बारामती शहर व तालुक्यात अवजड वाहनामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
बारामती शहर व तालुक्यात अवजड वाहनांच्या धडकेने निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. बारामती तालुक्यात विविध विकास कामे सुरु आहेत वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमधून ओव्हरलोड पद्धतीने वाहतूक भरधाव वेगाने वाहन चालक वाहन चालवित असल्याने अपघात घडत आहेत. शहरातील अनेक रस्त्यांवर बारामती परिसरातील शाळा रुग्णालय प्रशासकीय कार्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर नागरिकांची वर्दळ असते त्यामुळे मुजोर अवजड वाहन चालक नियमांचे उल्लंघन करत वेगाने वाहन चालवत असतात वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी बारामती तालुक्यात अवजड वाहनांची तपासणी करून उपाययोजना व कारवाई करण्यासाठी  बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे तसेच उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांना सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे, दशरथ मांढरे, संदिप साबळे, संजय वाघमारे, सुरेश भोसले, हरी चांदणे, विजय किर्वे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!