October 24, 2025

व्यापारी महासंघ अध्यक्षपदी सुशीलशेठ सोमाणी तर सचिवपदी स्वप्नील मुथा

Picsart_23-10-11_18-43-51-891
बारामती : बारामती व्यापारी महासंघ अध्यक्षपदी सुशीलशेठ सोमाणी आणि कार्याध्यक्षपदी जगदीशशेठ पंजाबी यांची तर सचिवपदी स्वप्नील मुथा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बारामती व्यापारी महासंघाचे संस्थापक नरेंद्र गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मिटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी बारामती नगरीचे माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे व व्यापारी महासंघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
बारामती व्यापारी महासंघाची नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे. संस्थापक : नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष : सुशील सोमाणी, कार्याध्यक्ष : जगदीश पंजाबी, उपाध्यक्ष : शैलेश साळुंके, उपाध्यक्ष : संतोष टाटिया, सचिव : स्वप्निल मुथा, सहसचिव : प्रशांत चांदगुडे, खजिनदार : शब्बीर बोहरी, सह खजिनदार : महेश ओसवाल, कार्यकारणी संचालक मंडळामध्ये :- संभाजी किर्वे, श्याम तिवाटणे, अतुल गांधी, प्रवीण आहुजा, प्रमोद खटावकर, सुधीर वाडेकर, पंडित भागवत हे असतील तर सल्लागार म्हणुन सुरेंद्र  मुथा, फकरू बोहरी, किशोर सराफ यांची निवड करण्यात आली आहे.

You may have missed

error: Content is protected !!