आदित्य वाघ याचे कबड्डीमध्ये राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक यश
बारामती : विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर, बारामती या शाळेतील विध्यार्थी आदित्य वाघ याने २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत हावडा पश्चिम बंगाल येथे आयोजित केलेल्या सी.आय.एस.सी.ई राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले असून त्याची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र कबड्डी संघातही निवड झाली आहे.
निवड झालेल्या महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीतील उत्तर भारताविरूध्दचा सामना जिंकून अंतिम फेरीसाठीही ते पात्र ठरले होते. विशेष म्हणजे या अंतिम फेरीत ते ओडिशा विरूध्दचा सामना खेळले आणि त्यांना उपविजेते पद मिळाले.
संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार व व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अॅड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव अॅड. नीलीमा गुजर खजिनदार युगेंद्र पवार, व सदस्य डॉ. आर. एम. शहा, किरण गुजर श्रीकांत सिकची तसेच रजिस्ट्रार शिरीष कंभोज यांनी आदित्यचे अभिनंदन केले. आदित्यला मोहन कचरे व शाळेच्या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेचे प्राचार्य आशिष घोष व उप प्राचार्या रूपाली जाधव, शिक्षक यांनी अभिनंदन केले.
