नोटीसीचा राजकीय विषय करणं योग्य नाही …अजित पवार
बारामती : नोटीशीला राजकीय स्वरूप देणे योग्य नाही असा सबुरीचा सल्ला उपमुख्य मंत्री पवार यांनी आमदार रोहित पवार यांना दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत एका कार्यक्रमानिमित्त आले असताना बारामती ॲग्रो या कारखान्याला राजकीय आकसापोटी नोटीस पाठवल्याच्या प्रश्नावर पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राजकीय आकसाने कोणी नोटीस काढली नाही, मागच्या वर्षात श्रीनिवास पवार यांच्या शरयूला आली होती, आमच्याही काही युनिटला नोटीस आल्या होत्या, नोटीस काढणे ही शासकीय प्रक्रिया असते, कोणताही कारखाना चालवताना पर्यावरणाचा समतोल राखून कारखाने चालवायचे असतात , नोटीस आली, का आली ? कशी आली ? उगाच नोटीसाचा राजकीय स्वरूप देणे योग्य नाही हे माझे मत आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली
महाराष्ट्र प्रदूषण नियामक बोर्डाने बारामती ॲग्रो या कारखान्याला रातोरात ७२ तासात कारखाना बंद करण्याची सूचना दिली होती. त्यावर आमदार रोहित पवार यांनी न्यायालयात धाव घेतली होती व न्यायालयाकडे मुदत वाढीची मागणी केली होती त्यावर न्यायालयाने दिलासा देत मुदतवाढ दिली आहे