शर्मिला पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन

बारामती : शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील आई प्रतिष्ठान व मा. नगरसेवक सत्यव्रत अर्जुनराव काळे मित्र परिवार यांच्या वतीने मिशन बोर्डिंग येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व केक कापण्याच्या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हास्तरीय जुदो कुस्ती स्पर्धेमध्ये बारामती शहरातील युवापैलवान वर्ष गायकवाड व विनोद गायकवाड या दोन बंधूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद, मिशन बोर्डिंगचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव गायकवाड सुभाष जांभुळकर, मा.नगरसेवक सिद्धनाथ भोकरे, निलेश इंगुले, इम्रान पठाण,पत्रकार तानाजी पाथरकर, मा.नगरसेवक अनिल कदम, साधू बल्लाळ, सुधाकर काटे, भाऊसाहेब पडळकर, सुधाकर माने, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, विजय शितोळे, भालचंद्र ढमे, शेखर बनकर, सुरज देवकाते रमेश देशपांडे, यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनाथ बल्लाळ, अल्ताफ सय्यद, इम्रान पठाण, साधू बल्लाळ, तानाजी पाथरकर, बाळासाहेब जाधव, सुभाष जांभुळकर, आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल साळवे यांनी केले व आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्यव्रत काळे यांनी मानले