ईद ए मिलाद निमित्त इस्लामिक मराठी साहित्य उपक्रम
बारामती : शहरात सालाबादप्रमाणे पैगंबर जयंती ( ईद ए मिलाद ) उत्साहात साजरी करण्यात आली यावर्षी पैगंबर जयंती ( ईद ए मिलाद ) चे औचित्य साधून बारामती शहरातील मरहुमा फरजाना माॅं फाऊंडेशन व पुणे जिल्हा जमात ए ईस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लामिक मराठी साहित्य उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात पैगंबर जयंती मिरवणूक मार्गावर इस्लामिक मराठी साहित्य बुक स्टॉल उपलब्ध करून मराठी भाषेतील दिव्य कुरआन तसेच पैगंबर हजरत मोहम्मद ( स. ) यांच्या जीवनावर आधारित मराठी भाषेतील १०० पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी बारामती अर्बन बँकेचे विद्यमान संचालक शिरीष कुलकर्णी तसेच बारामती नगर परिषदचे माजी नगरसेवक सिध्दार्थ भोकरे, बारामती शहर संभाजी ब्रिगेडचे जेष्ठ सदस्य दिपक भराटे, सामाजिक क्षेत्रातील मंगेश मासाळ, बारामती नगर परिषदचे माजी नगरसेवक निलेश इंगुले यांना मराठी भाषेतील इस्लामिक पुस्तके आणि मराठी भाषेतील दिव्य कुरआन अध्ययन करण्यासाठी देण्यात आले. यावेळी मरहुमा फरजाना माॅं फाऊंडेशनचे अध्यक्ष जहीर पठाण , पुणे जिल्हा जमात ए ईस्लामी हिंदच्या महिला जेष्ठ सदस्या श्रीमती फरजाना सय्यद , मुस्लिम बॅकेचे विद्यमान संचालक आलताफ सय्यद, साप्ताहिक वतन की लकीरचे संपादक तैनुर शेख, तांबोळी जमात बारामतीचे अध्यक्ष मुनीर तांबोळी, बारामतीची सुप्रसिद्ध राजापुरी भेळचे राजाभाऊ शेख , एजाज अत्तार, संभाजी ब्रिगेडचे अस्लम तांबोळी, अमान पठाण तसेच मित्रपरिवार उपस्थित होते बारामती शहर तसेच पंचक्रोशीतील सर्व ठिकाणी या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
