October 24, 2025

उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न

IMG-20230929-WA0027

बारामती : येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय बारामती व पत्रकार संघ बारामती यांच्या वतीने  रक्तदान  शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात 18 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट, माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती यांनी रक्तसंकलन केले.

सरकारच्या आयुष्यमान भाव: योजने अंतर्गत शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर पोटरे, यांच्या हस्ते तर यावेळी ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश बारवकर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश जगताप पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. विजय भिसे, डॉ. निर्मलकुमार वाघमारे, डॉ. रणजित मोहिते, आदी मान्यवर उपस्थित होते.

शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने आयुष्यमान भव: मोहिमे अंतर्गत विविध तपासण्या व उपचार तसेच 18 वर्षांवरील सर्व पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी सुरु करण्यात येणार आहे तसेच वैद्यकीय महाविद्यालय बारामती यांच्या सहकार्याने दरमहा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश जगताप यांनी दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन करीत असताना दीपप्रज्वलन करण्याचा मान रुग्णालयातील सफाई कर्मचारी आणि रुग्णालयातील मावशी यांना दिल्याने रुग्णालयाच्या वरिष्ट अधिकारी यांचे कौतुक केले जात होते.  

You may have missed

error: Content is protected !!