बारामतीत अॅकॅडमीचे पेव फुटले आहे. ….अजित पवार
बारामती : आमच्या इथे तर एवढा अॅकॅडमीचे पेव फुटले आहे, परवानगी आणतात कुठनं तरी, कुणाशी तरी टायाप करतात, लाखो रुपये फी घेतात आणि आमचे पालक फी द्यायला मागे पुढे बघत नाहीत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील सुरु असलेल्या अॅकॅडमीच्या शिक्षण पद्धतीवर तोशारे ओढले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विद्या प्रतिष्ठान येथे बारामती आणि दौंड तालुक्यातील शिक्षण संस्थांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. बारामतीत बेकायदा सुरु असलेल्या कोचिंग क्लास आणि अॅकॅडमी यांच्या विषयी उपमुख्यमंत्री यांनी अॅकॅडमीच्या शिक्षण पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
पुढे पवार म्हणाले की, मराठी शाळा जरा चांगल्या करायला गेलो की, आमच्यावर अन्याय होतो, आमचं आता काय खरं नाही अशी ओरड सुरु होते मात्र याउलट शहरातील नावाजलेल्या शाळांमध्ये पटसंख्या तपासा तेथे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पटसंख्या आणि उपस्थिती यामध्ये तफावत पहायला मिळेल तर आमच्या बारामतीत तर एवढा अॅकॅडमीचा पेव फुटला आहे, की हे चालक परवानगी आणतात कुठनं तरी, कुणाशी तरी टायाप करतात आणि लाखो रुपये फी घेतात आणि आमचे पालक अॅकॅडमी चालकांच्या फसव्या जाहीतातीना भुलून वाट्टेल तेवढी फी द्यायला मागे पुढे बघत नाहीत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील सुरु असलेल्या अॅकॅडमी विषयी शंका उपस्थित केली. तर अॅकॅडमीच्या शिक्षण पद्धतीमुळे अनेक शाळा विध्यार्थ्याविना ओस पडायला लागल्या आहेत. याबद्दल कधी शिक्षक संघटनेने आवाज उठविला नाही किंवा त्या बद्दल मला कधी काही सुचविले देखील नाही. अशा शब्दात शिक्षक संघटनेवर देखील उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी नाराजी व्यक्त केली.

