सकल मुस्लिम समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.
बारामती : जगाला शांतीचा, एकतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे हजरत मोहम्मद पैगंबर (सा ) यांच्या जयंती उत्सवानिमित्त सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले.
येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी उच्चांकी 121 रक्त बाटली संकलित झाली. यावेळी मुस्लिम समाजातील तरुणांनी “मानवी नाते हे रक्ताचे नाते असून ते रक्ताला बांधील आहे या नात्याचे उत्तरदायित्व पूर्ण करणे ही सर्व प्रत्यक धर्माची शिकवण आहे या संकल्पनेतून हजरत महम्मद पैगंबर यांनी मानवता जपण्याचा दिव्या संदेश आपल्या वाचनातून ( आयात ) दिला आहे. हाच उद्देश ठेऊन सकल मुस्लिम समाजाच्या वतीने अनोख्या पद्धतीने ईद ए मिलाद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचे प्रथम पाऊल म्हनुब सकल मुस्लिम समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
