हजरत मोहम्मद पैंगबर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

बारामती : इस्लाम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैंगबर यांच्या जयंतीनिमित्त सकल मुस्लिम समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ही जयंती ईद ए मिलाद या नावाने साजरी केली जात आहे. मुस्लिम धर्मीयांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो. यानिमित्ताने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त समाजोपयोगी, धार्मिक उपक्रम राबविले जातात. अन्नदान, मिठाईवाटप, शैक्षणिक साहित्यवाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आदी समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात, याचाच भाग म्हणून येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती येथे दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 4 यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन सकल मुस्लिम समाज बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे.