महापुरुषांच्या विचाराशिवाय परिवर्तन अशक्य…. भगवानराव वैराट

बारामती : कोणत्याही समाजाची सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलायची असेल तर महापुरुषांचे विचार आत्मसात केल्याशिवाय परिवर्तन होणार नाही असे प्रतिपादन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराटसाहेब यांनी मांग गारुडी सामाजिक न्याय हक्क परिषदेमध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले यावेळी या परिषदेला मार्गदर्शक म्हणून सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे तर उद्घाटक म्हणून बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव हे उपस्थित होते.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती महोत्सवानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
यावेळी मांग गारुडी समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्या राज्यस्तरावरील पाच संघटनांच्या प्रमुखांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यामध्ये मुंबईमधील अमर कसबे कोल्हापूर येथील बाबासाहेब चौगुले पुणे येथील हरीश सकट लोणी काळभोर येथील संजय राखपसरे थेऊर येथील तुकाराम अवचट भिवंडी येथील दीपक लोंढे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तर बारामती येथील पत्रकारिता क्षेत्रांमध्ये योगदान देणारे दैनिक केसरीचे पत्रकार सोमनाथ कवडे व मुस्लिम समाजासाठी कार्य करणारे अल्ताफ सय्यद यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी व बापू खंडाळे यांना एक युवा उद्योजक म्हणून समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
तसेच यावेळी मांग गारुडी समाजातील दहावी व बारावी मधील पास झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तर समाजातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले संघटनेच्या वतीने वाटप करण्यात आले
यावेळी पुढे बोलताना भगवानराव वैराट म्हणाले की मांग गारुडी समाजाने विचाराची लढाई लढत असताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या महापुरुषांचे विचार आत्मसात केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही त्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरून प्रगती करावी आपली शैक्षणिक प्रगती नसल्यामुळे समाजाची वाढ खुंटली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले त्यासाठी येथून पुढच्या काळामध्ये समाजातील सर्व विद्यार्थ्यांना योग्य व उच्च दर्जाचे शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे भगवानराव वैराट यांनी मनोगत व्यक्त केले. .
सामाजिक न्याय विभागाचे सह आयुक्त विशाल लोंढे सूचना करताना ते म्हणाले की शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे सामाजिक न्याय विभागाचे कर्तव्य असून त्यासाठी आपल्या विभागाकडून प्रयत्न करण्यात यावे अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली
यावेळी सह आयुक्त विशाल लोंढे यांनी शासनाच्या सर्व योजनांची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला तसेच इथून पुढच्या काळामध्ये शिक्षणाचे महत्त्व हे त्यांनी समजावून सांगितले अलीकडील काळामध्ये सर्व सुख सुविधा उपलब्ध असताना सुद्धा शासनाच्या सर्व योजना असताना सुद्धा आपल्या समाजातील शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली
आज इतर घटक पुढे जात असताना आपला समाज मागे का आहे याचा देखील विचार करण्याची गरज असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजनेविषयी काही अडचणी असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधण्याची आव्हान देखील त्यांनी यावेळी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन सकट, अभिमन्यू लोंढे, बापू पाथरकर, शरद पाथरकर, मोहन लोंढे, पप्पू भाले, दिगंबर पाथरकर, लखन सकट, करण सकट इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.