अजित पवारांनी पडळकरांचा शेलक्या शब्दात घेतला समाचार

बारामती : लोकशाहीमध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे, बोलत असताना भान ठेवून बोलावे मात्र सध्या वाचाळवीरांची संख्या वाढत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला.
बारामती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधार सभा उपमुख्यमंत्री अजित यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी पवार यांनी प्रथमच पडळकर यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. सभेत अजित पवार यांच्या समोर भर सभेत बारामतीच्या एका जेष्ट नागरिकाने अजित पवार यांच्या बद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द व्यक्त केले होते त्याबद्दल निषेध व्यक्त करीत पडळकर यांना काळे फासण्याचा इशारा दिला तसेच आमदार रोहित पवार यांच्या बद्दल देखील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला यावर पावर यांनी उपस्थितांना सबुरीने घेण्याचा तसेच शांत राहण्याचे आवाहन केले तसेच ही सभा राजकीय व्यासपीठ नसून इथे बँकेच्या संबंधातील विषयांवर सर्वांनी चर्चा करावी असेही आवाहन पवार यांनी उपस्थितांना केले.