पर्यावरण पूरक गणेश उत्सवासाठी बारामती नगर परिषदेकडून स्पर्धांचे आयोजन

बारामती : माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरची होणारी हानी रोखण्यासाठी बारामती नगर परिषदे तर्फे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांना व घरगुती गणेशोत्सव साजरे करणाऱ्या भाविक भक्तांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे सर्वांनी यंदाचा बाप्पाचा उत्सव पर्यावरण पूरक साजरा करावा या उद्देशाने व पर्यावरणाचा संरक्षण व्हावे हा हेतू समोर ठेवून पर्यावरण पूरक गणेश उत्सव या स्पर्धाचे आयोजित करण्यात आल्या आहेत.
कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचे आवाहन केले आहे त्यांच्याच आवाहनाला प्रतिसाद देत बारामती नगर परिषदेने या स्पर्धांचे आयोजन केले आहे त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे. म्हणून स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दिनांक १९ सप्टेंबर ते २७ दरम्यान होतील.
१) पर्यावरणपुरक सार्वजनिक मंडळ गणेशोत्सव स्पर्धा,
२) पर्यावरण पूरक घरघुती गणेशोत्सव स्पर्धा,
३) पर्यावरण पूरक घरगुती गौरी गणपती आरस देखावा स्पर्धा,
४) पर्यावरण पूरक गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा,
या सर्व स्पर्धांचे आयोजन बारामती नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे तरी सर्व सार्वजनिक मंडळे सर्व नागरिक यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन बारामती नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. बारामती शहरातील नागरिकांना भाविक भक्तांना या स्पर्धेत भाग घेता येईल.पर्यावरणाला हातभार लावणाऱ्या व पर्यावरण पूरक गणेशोत्स साजऱ्या करणाऱ्या नागरिक व सार्वजनिक गणेश मंडळाना व घरगुती गणेशोत्सवांना, बारामती नगर परिषदेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.