बारामती नगर परिषदे कडून स्वच्छतेचा जागर

बारामती : स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग २.० स्पर्धा’ जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून ‘युथ वर्सेस गार्बेज’ अर्थात ‘कचऱ्याविरोधातील लढाईत युवकांचा सहभाग’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘बारामती वॉरियर्स ’ या संघाच्या माध्यमातून कचरा मुक्त शहर संकल्पना अधिक व्यापकतेने राबवण्यासाठी आणि स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छता पंधरवडा या अभियानाच्या आयोजन केले आहे.
राष्ट्रव्यापी सेवा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्तरावर इंडियन स्वच्छता लीग होत आहे. या स्पर्धेत बारामतीला देशातील सर्वात स्वच्छ शहर बनविण्यासाठी नगर परिषदेसह नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करून नागरिक आपली जबाबदारी पार पाडत असून शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिका कटीबध्द आहे. स्वच्छ शहर ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी बारामती नगर परिषदेच्य सफाई कर्मचारी मित्रांसोबत शहरातील नागरिक बारामती वॉरीअर्स या संघात सहभागी होवून बारामतीच्या स्वच्छतेचे मानांकन उंचावण्यासाठी आपले योगदान देत आहेत या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यत विविध प्रभागात ११४ ठिकाणी स्वच्छतेच काम करण्यात आले.
नगरपालिकेच्या वतीने “इंडियन स्वच्छता लीग २.०” अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक १७ सप्टेंबर २०२३ पासून कऱ्हानदी, म्हसोबानगर, कारभारी सर्कल, देसाई इस्टेट, तांदुळवाडी,विविध धार्मिक ठिकाणे यासह सर्व प्रभागनिहाय सर्व युवक महिला विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, गणेश मंडळे यांच्यासह शालेय विद्यार्थी, शिक्षक, नगरपालिका अधिकारी- कर्मचारी आणि परिसरातील नागरिक सफाई मित्रांच्या मदतीने स्वच्छतेच काम प्रभावी पणे सुरु आहे.
इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत 17 सप्टेंबर रोजी बारामती शहरातून बारामती सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल फेरीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. असे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी या दृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे. शहर स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांचा उत्स्पुर्त सहभाग मिळत आहे या अभियानात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक,युवक,लोकप्रतिनिधी,महिला बचत गट,व महिला मंडळे,यांचे सदस्य विविध सामाजिक संस्थांचे सदस्य, व नागरिकांनी सहभागी होऊन या अभियानात आपले योगदान देत आहेत.
तसेच या अभियाना अंतर्गत सफाई कर्मचारी,कचरा वेचक, यांना विविध शासकीय योजना, विमा योजना,आरोग्य तपासणी,क्षमता बांधणी प्रशिक्षण,तसेच पथविक्रेते फेरीवाले पी एम स्वनिधी या योजेने अंतर्गत लाभ देण्यात येत आहेत अश्या प्रकारे इंडियन स्वच्छता लीग हे एक शासकीय अभियान न राहता लोकचळवळ व्हावी या साठी बारामती नगर परिषद आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.