डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू

बारामती : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी शिवनंदन हॉस्पिटलमधील डॉ. तुषार गदादे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, 22 डिसेंबर 2022 रोजी एका महिलेला शिवनंदन हॉस्पिटल येथे डॉ. तुषार गदादे यांच्याकडे प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. प्रसूती सिजर ( शस्त्रक्रिया ) करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आणि डॉक्टर स्वतः बाहेर गेले मात्र दरम्यानच्या काळात महिलेस प्रसूती कळा सुरु झाल्या त्यावेळी बाळ पायाळू असल्याने हजर असणाऱ्या परिचारिका यांनी प्रसूती केली मात्र प्रसूती दरम्यान बाळ गुदमरले या सर्व प्रक्रीयेदरम्यान डॉक्टर दवाखाण्यात हजर नव्हते त्यामुळेच बाळाचा मृत्यू झाला या बाबतची फिर्याद बारामती शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे समिती नेमून चौकशी करण्यात आली त्या समितीने डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले तसेच प्रसूतीवेळी डॉक्टर स्वतः हजर नसल्याचे स्पष्ट झाले असेही अहवालात नमूद केले आहे. चौकशी आहवालानुसार त्यावरून डॉक्टरांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
———————————————————————————————————————————————————————-
“अशा निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांमुळे समाजातील इतर डॉक्टर देखील बदनाम होत आहेत या प्रकरणी संबंधित डॉक्टरांची तक्रार महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलला देखील करणार आहे असे मत माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी बोलताना व्यक्त केले.”