October 24, 2025

प्रशासकीय कार्यालयासमोर कामगारांचे धरणे आंदोलन, .. सहाय्यक कामगार आयुक्तांचा निषेध

IMG_20230915_174513

बारामती : येथील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या निषेधार्थ तसेच बांधकाम कामगार यांच्यावर कामगार आयुक्त कार्यालयाकडून होत असलेल्या अन्याया विरोधात  बहुजन असंघटीत कामगार संघटनेच्या वतीने प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

बारामती येथील बांधकाम कामगार यांच्या अनेक प्रश्नावर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे कामगारांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. तसेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय बारामती येथे कामगारांच्या अडचणी घेवून गेल्या नंतर तेथे नोंदणी अधिकारी व त्यांचे इतर सहकारी कर्मचारी हे एक रुपया नोंदणी शुल्का ऐवजी वीस रुपये घेत आहेत तर त्या बाबत चौकशी केली असता नोंदणी अधिकारी व इतर कर्मचारी हे महिला कामगारांना अपमानास्पद वागणुक देत कार्यालया बाहेर हाकलतात व परत या ठिकाणी तुमचे फॉर्म मंजुर असले तरी येऊ नका असा सज्जड दम देत आहेत. त्याच बरोबर इतर जिल्ह्यामध्ये कामगारांना चांगल्या दर्जाची कामगार पेटी मिळाली आहे मात्र पुणे जिल्ह्यामध्ये पेटीचा दर्जा हा अत्यंत हलक्या दर्जाचा आहे.  व कधी पेटी दिली जाती तर कधी कार्ड दिले जात नाही, तर कधी कार्ड दिले तर पेटी दिली जात नाही. तर त्यातही एखादी वस्तू कमी दिली जात आहे. अनेक कामगारांना बाहेरगावाहून यावे लागते त्यामुळे कामगारांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. त्याच बरोबर कामगारांची स्कॉलरशिप देखील लाल फितीत अडकली आहे . कामगार कार्यालयाकडून जाणीवपूर्वक चुकीचे फॉर्म मंजूर केले जातात आणि बरोबर असलेले अर्ज रद्द केले जातात तसेच स्कॉलरशिपचे फॉर्म अनेक वेळा अपडेट करूनही तीच तीच अडचण आणली जात आहे.  सरकारी कामगारांना अटल आवास योजना देण्यात येते मात्र या असंघटीत कामगारांना आद्यप घरकुल योजना देखील पुणे जिल्ह्यामध्ये दिली नाही. या सर्व बाबींचा गांभिर्याने विचार करून बारामती येथील कामगार आयुक्त कार्यालय येथील नोंदणी अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी अशा मागण्या निवेदनाद्वारे कामगारांनी केल्या आहेत  त्याच बरोबर त्यांना पाठीशी घालणाऱ्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या निषेधार्थ बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीने बारामती प्रशासकीय कार्यालयासमोर समोर धरणे आंदोलन करण्यात आले

You may have missed

error: Content is protected !!