October 24, 2025

तलाठ्यांच्या उपस्थिती व कार्यालयीन माहितीचा बोर्ड लावण्याच्या तहसीलदारांच्या सूचना

Picsart_23-09-14_19-42-08-828

बारामती : बारामती आणि परिसरातील अनेक तलाठी कार्यालयात कार्यालयीन कामकाजाबाबतचा बोर्ड लावण्याचे निर्देश असताना त्याला न जुमानता तलाठी कार्यालयात बोर्डच लावले नसल्याची तक्रारी दिल्यानंतर तहसीलदार गणेश शिंदे यांनी माहितीचा फलक लावण्याच्या सूचना तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिल्या आहेत.

तलाठी सज्जावरील तलाठ्यांच्या उपस्थिती बाबत शासन परिपत्रक महसूल व वन विभागाचे आहे त्यानुसार, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात तलाठ्याचा नियोजित दौरा, बैठका, तलाठ्याची कर्तव्य, जबाबदाऱ्या, दूरध्वनी क्रमांक / भ्रमणध्वनी क्रमांक, शासनाने दिलेल्या निवासस्थानात राहणे, किती मुदतीत मागीलेले उतारे मिळतील, तसेच तलाठी कार्यालयात बेकायदा खाजगी व्यक्तीला कामाला ठेवू नये अशी विविध नमूद सेवाविषयक बाबींच्या माहीतीचा तपशील कार्यालयाच्या आवारात नागरिकांना दिसेल असा दर्शनी भागात लावावा असे असताना प्रत्यक्षात या नियमांना धाब्यावर बसवले जात आहे.  त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांनी शासन परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नसल्या कारणाने आपल्या स्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश पारित करण्यात यावे असे निवेदन बारामतीचे तहसीलदार यांना दिले होते.

सदर निवेदनाची दखल घेत बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी बारामती तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना कार्यालयाच्या दर्शनी भागावर बोर्ड लावण्याचे व कार्यवाहीचे  व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत.

You may have missed

error: Content is protected !!