युनिटी फ्रेंडस् सोशल क्लबची दहीहंडी उत्साहपूर्ण संपन्न
बारामती : युनिटी फ्रेंडस् सोशल क्लब, बारामतीची सर्वात जुनी व मानाची पहिली दहिहंडी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न संपन्न झाली. यावेळी गोपालकालांचा आणि दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या तरुणांचा उत्साह संगीताच्या तालावर थिरकत होता तर आलेल्या गोविंदां पथकांचा दहीहंडीचा आनंद शिगेला पोहोचत होता.
दहीहंडीचे यंदाचे २६ वे वर्ष होते या वर्षाची दहिहंडी ‘योगेश जगताप दहिहंडी संघ, बारामती या संघाच्या गोपालकलांनी फोडण्याचा मान पटकाविला. त्यांना २१,०००/- रूपये रोख व ट्रॉफी असे बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला.
युनिटी फ्रेंडस् सोशल क्लबचे अध्यक्ष व मा. नगरसेवक निलेश इंगुले, अक्षय इंगुले, चेतन इंगुले, सनी नागे, बाळा इंगुले, रवि करळे, दिपक शाहीर, सोमनाथ धनराळे, अमीत पलंगे, अल्ताफ शेख, जमीर शेख, फारूख सय्यद, ऋषिकेश इंगवले, राजेश काळे, राजेन्द्र कांबळे, शुभम बिंद्रे, यश घोणे, सोहम वाडेकर, ओम इंगुले, सोनू बेंद्रे, रोहित गायकवाड, रोहित पलंगे, सागर खलाटे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
