प्रशासकीय अधिकारी यांचे डोके ठीकानावर आहे का ? संतप्त बारामतीकरांचा सवाल
बारामती : सध्या दहीहंडी निमित्त उत्साही दहीहंडी आयोजकांनी जंगी तयारी केली आहे मात्र एखादे नोंदणीकृत मंडळ अपवाद वगळता अनेक मंडळांनी रस्ता आडवून वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे नागरिकांना वेठीला धरल्याने सर्व सामान्य नागरिकांच्या तोंडून प्रशासकीय अधिकारी यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
बारामतीची दहीहंडी म्हणजे नागरिकांची फसवणूक, रस्त्यांची आडवणूक आणि डी जेची मिरवणुक हे नित्याचे झाले आहे मा. उच्च न्यायालयाने या उत्सवा संदर्भात काही निकष लावले आहेत ते बारामतीत सर्रास दहीहंडी आयोजकांकडून धाब्यावर बसविले जात आहेत तर प्रशासकीय अधिकारी मात्र मुग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेत आहेत ज्यांनी नियम पाळायचे ते आणि ज्यांनी नियमांना बांधील राहायचे ते दोघेही नियमांना वेठीला धरताना बारामतीत चित्र आहे.
नगरपालिका आणि पोलिस परवाना घेताना दहीहंडी आयोजकांनी 10 बाय 20 च्या स्टेजच्या परवाना मागितला मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्ष रस्त्यावरच रस्ता अडवून 30 बाय 50 च्या स्टेज उभाले तर परवाना घेताना वाहतुकीला अडचण येणार नाही असे असताना आयोजकांनी चक्क परवाना देनाऱ्या प्रशासकीय बाबूंना फसविल्याचे चित्र आहे तर प्रत्यक्ष चौकशी करता शहरात दहीहंडी आयोजनाची कोणत्याच आयोजकाला परवानगी नसल्याचे चौकशीअंती समजले त्यातही आयोजकांनी नावाला एक अर्ज दिला आणि त्यावर संबंधित प्रशासकीय कार्यालयाचा शिक्का मिळाला की झाले परवाना मिळाला असे चित्र समोर आले.
बारामतीच्या मुख्य शहरात दहीहंडी आयोजकांनी रस्त्याची कोंडी केल्याने दोन दिवस वाहतुकीची कोंडी झाली यामुळे अनेक शाळकरी महाविद्यालयीन आणि आरोग्य कर्मचारी यांना गावाला वळसा मारून शहरात आणि शिक्षण संस्थेत जाण्याची वेळ आली.
तर एकीकडे नागरिक वाहतूक कोंडीने हैराण असतानाच दुसरीकडे अनेक चौकात वाहतूक पोलिसांची मात्र शिट्या मारून – मारून तारांबळ उडाल्याचे निदर्शनास आले. तर आयोजकांकडून सर्रास नियम धाब्यावर बसविले जात असताना प्रशासकीय बाबु गप्प का असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तर अनेकदा या उत्सवाच्या नादात अनेक आयोजक प्लेस लावनारांकडून दुकानांची मोकळी हवा, नैसर्गिक प्रकाश अडविला जातो आणि ग्राहकांना दुकानात जायला देखील जागा शिल्लक ठेवलेली नसते. यामुळे शहरातील दुकानदार देखील या कारणाने संतप्त असल्याचे दुकानदारांनी बोलताना व्यक्त केले.
