October 24, 2025

पणदरे एमआयडीसीसाठी महावितरणचे नवीन उपकेंद्र उभारणार….सुनील पावडे

IMG-20230905-WA0151

बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन निवेदन देताना.

बारामती : पणदरे लघु औद्योगिक  क्षेत्रात नवीन लघुउद्योगांची संख्या दिवसोंदिवस वाढत असून सद्यस्थितीतील लघुउद्योजकांकडून सदोष विद्युत पुरवठ्याबाबत  वारंवार तक्रारी  येत आहेत. या सर्व बाबींचा अभ्यास करून पणदरे परिसरात लवकरच महावितरणचे  नवीन उपकेंद्र उभारणार असून त्यातून पणदरे औद्योगिक क्षेत्राला स्वतंत्र वाहिनीने विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे असे मत बारामती महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी व्यक्त केले.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत पावडे बोलत होते यावेळी बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे, अंबिरशाह शेख वकील, हरिभाऊ थोपटे, उद्योजक चंद्रकांत नलवडे, संजय पवार, संदीप जगताप, हरिश्चंद्र खाडे, उज्ज्वल शहा, किरण जगताप, निलेश जगदाळे, किशोर खरात, नितीन जगताप, विजय कदम, संतोष वाघ, शहाजी साबळे, शिवाजी साळुंखे, शिवराज जामदार, धनंजय शिंदे, संतोष बोबडे आदी उद्योजकांसह महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, उपकार्यकारी अभियंता मोहन सुळ. अतिरिक्त कार्यकारी अभियंता मदन साळवे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर नवीन उपकेंद्र उभारल्यामुळे काही दिवसातच येथील उद्योगांना योग्य दाबाने अखंड विद्युत पुरवठा होणार असून उद्योगांच्या  विद्युत पुरवठ्या बाबतच्या तक्रारींचे निराकरण होईल अशीही ग्वाही पावडे यांनी  दिली.
तर धनंजय जामदार यावेळी बोलताना म्हणाले की पणदरे एमआयडीसीतील उद्योजकांचे विद्युत पुरवठ्यासंबंधीच्या समस्या प्रलंबित आहेत. व्होल्टेज  चढउतार व वारंवार ट्रिपिंग द्वारे खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे लघुउद्योगांच्या किमती यंत्रसामुग्री व कच्च्या मालाचे अतोनात नुकसान होऊन वारंवार आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अखंडित विद्युत पुरवठा होण्यासाठी पणदरे एमआयडीसीला एक्सप्रेस फीडर द्वारे विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी आग्रही मागणी धनंजय जामदार यांनी यावेळी केली. यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्योजकांच्या शिष्टमंडळासह भेटणार असलेचे धनंजय जामदार यांनी सांगितले.

You may have missed

error: Content is protected !!