पोलीस पाटील भरती…संवर्ग निहाय आरक्षण.

बारामती : बारामती व इंदापूर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील या पदासाठी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यासाठी पात्र उमेदवारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे.
पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या बारामती व इंदापुर तालुक्यातील एकूण 34 गावांचा, जातीच्या संवर्ग निहाय आरक्षण तक्ता, गांवाचे नाव व आरक्षण प्रवर्ग पुढील प्रमाणे.
1 ) कळंब – अनुसूचित जाती, 2 ) निंबूत – अनुसूचित जाती (स्त्री) 3 ) सोनगाव – अनुसूचित जाती 4 ) शिर्सुफळ – अनुसूचित जाती (स्त्री), 5 ) निरगुडे – अनुसूचित जमाती, 6 ) सरडेवाडी – अनुसूचित जमाती (स्त्री) 7 ) शहा – अनुसूचित जमाती (स्त्री) 8 ) वरकुटे खु. – अनुसूचित जमाती (स्त्री), 9 ) – कालठण नं. २ – अनुसूचित जमाती, 10 ) कुरवली – अनुसूचित जमाती,11 ) सिध्देश्वर निंबोडी – अनुसूचित जमाती, 12 ) व्याहाळी – अनुसूचित जमाती, 13 ) आंबी बु. – अनुसूचित जमाती, 14 ) कुंभारगाव – अनुसूचित जमाती, 15 ) अवसरी – अनुसूचित जमाती, 16 ) जळगाव सुपे – अनुसूचित जमाती (स्त्री), 17 ) कौठाळी – वि.जा.अ., 18 ) माळेगाव खु. – वि.जा.अ., 19 ) गोंदी – भ.ज.ब. 20 ) निरनिमगाव – भ.ज.ब. (स्त्री), 21 ) पवारवाडी – भ.ज.ड (स्त्री), 22 ) चव्हाणवाडी – वि.मा.प्र. (स्त्री), 23 ) धुमाळवाडी – वि.मा.प्र., 24 ) वाणेवाडी – इ.मा.व, 25 ) काझड – इ.मा.व, 26 ) माळवाडी (लाटे) – इ.मा.व. (स्त्री) 27 ) देऊळवाडी – इ.मा.व,28 ) गाडीखेल – इ.मा.व, 29 ) डाळज नं.1. – इ.मा.व. (स्त्री), 30 ) बजरंगवाडी – इ.मा.व. (स्त्री) 31 ) जाधववाडी – इ.मा.व, 32 ) जळकेवाड़ी – EWS (स्त्री), 33 ) भावडी – EWS (स्त्री), 34 ) राजवाडी – EWS (स्त्री).
या संदर्भातील सविस्तर माहिती ( पात्रता, अर्ज करण्याची मुदत ) याच पेजवर या आधीच्या बातमीत प्रकाशित केली आहे.