अजित पवार सरकारमधून बाहेर पडा

स्वप्नील शिंदे, बारामती.
अजित पवार सरकारमधून बाहेर पडा
मराठा क्रांती मोर्चामध्ये घोषणा.
बारामती ( वार्ताहार ) मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार असमर्थ असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे तर सरकारचा भरलाय घडा.., अजित दादा सरकारमधून बाहेर पडा…, बाहेर पडा.. बाहेर पडा..अजित दादा सत्तेतून बाहेर पडा अशा आशयाच्या घोषणा मराठा क्रांती मोर्चा प्रसंगी देण्यात आल्या.
जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभर समाजाकडून निषेध नोंदविला जात आहे बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पूर्ण दिवसभर कडकडीत बंद पुकारून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील कसबा येथुन मोर्चाला सुरुवात झाली ते थेट मोर्चा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या भिगवण चौकात निषेध सभा घेण्यात आली त्या ठिकाणी मराठा समाजाच्या समाजबांधवांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत सरकार व पोलिस प्रशासनाचा समाचार घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, तहसीलदार गणेश शिंदे आदी प्रशासकीय अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले.
तर सरकारने आरक्षण दिले नाहीतर आगामी निवडणूकांवर मराठा समाजाच्या वतीने बहिष्कार घालण्यात येईल अन्यथा बारामातीतुंच आम्ही अनेक कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभे करू हाच प्रकार राज्यभर केला जाईल अशी भूमिका घेतल्याचे व्यक्त केले.
दरम्यान सरकारला आरक्षण देणे जमत नसेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे अश्या घोषणा देण्यात आल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर सर्वच नेते मंडळीनी पाठिंबा द्यायला हवा होता मात्र अशी भूमिका देखील अनेक नेत्यांनी व्यक्त केली नसल्याचे आंदोलकांनी व्यक्त केल.