विधी अभ्यासक्रमानंतर करिअरच्या अनेक संधी… अँड जगताप…

बारामती : विधी विषयाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अकॅडमी लिटिगेशन आणि नॉन लिटिगेशन या तीन प्रकारांमध्ये आपले करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे, याच नाही तर अनेक क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ अँड. शेखर जगताप यांनी दिली.
विद्या प्रतिष्ठान व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने विद्या प्रतिष्ठान वसंतराव पवार विधी महाविद्यालय येथे विधी अभ्यासक्रमानंतर करिअरच्या संधी या विषयावर अँड. जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या सचिव अँड. नीलीमा गुजर यांनी अँड. जगताप यांचे स्वागत केले. या प्रसंगी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्राचार्य डॉ. अतुल शहाणे उपस्थित होते.
अँड. जगताप या प्रसंगी म्हणाले की, करिअर सोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त आणि प्रामाणिकपणा हे गुण विद्यार्थी दशेतच असले पाहिजेत विधी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उत्तम वकील म्हणून नावलौकीक प्राप्त करताना तुम्ही अगोदर एक चांगला माणूस होणे गरजेचे आहे. वकील पक्षकार आणि न्यायाधीश दोघांवरही आपला प्रभाव पाडणारा असेल तरच वकीली करताना त्यास यश मिळू शकते.
या प्रसंगी रोहिणी जायभाय व अंकीता शेळके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अतुल शहाणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी एन्व्हॉर्यमेंटल फोरमचे सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.