जालना येथील घटनेचे बारामतीत पडसाद….., सोमवारी बारामती शहर व तालुका बंद.

बारामती : जालना येथे मराठा सामाजाच्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या घटनेचे पडसाद बारामतीत ठीक ठिकाणी पडले आहेत, तर सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी बारामती शहर व तालुका बंद पुकारण्यात आला असून, त्याच दिवशी निषेधार्थ मुक मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने निवेदन देवून सोमवार दि ४ सप्टेंबर रोजी बारामती शहर व तालुका बंद पुकारण्यात आला असून त्याच दिवशी निषेधार्थ मुक मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले असून श्री.छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, कारभारी चौक, कसबा येथुन साकळी १० वाजता मोर्चाला सुरुवात होईल अशी माहिती शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिली. तर हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने देखील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून लाठीहल्ला केलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्याची मागणी हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते तर मौजे पणदरे येथे देखील झालेल्या हाल्ल्याच्या निषेधार्थ टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.