मुंबई उच्च न्यायालयाची पोंधवडी सरपंच पदाच्या निवडणूकीस स्थगिती

बारामती : मुंबई उच्च न्यायालयाची पोंधवडी सरपंच पदाच्या निवडणूकीस स्थगिती मिळाल्याची माहिती गोंधवडीचे सरपंच लक्ष्मण पवार यांनी दिली
मौजे पोंधवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांचे विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दि.१५ फेब्रुवारी रोजी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव तहसीलदार इंदापूर यांचे कडे दाखल केला होता. त्याच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी त्याच दिवशी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी अविश्वास ठरावाच्या बैठकीची नोटीस जारी केली व २१ फेब्रुवारी रोजी अविश्वास ठरावाची बैठक आयोजित केली गेली सदर बैठकीमध्ये सरपंच व उपसरपंच यांचे विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. अविश्वासाच्या ठरावाच्या विरोधात पोंधवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचानी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले व सदर अपील जिल्हाधिकारी यांनी फेटाळले त्यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांचे आदेशा विरुद्ध सरपंच लक्ष्मण पवार यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली व त्याची सुनावणी नुकतीच झाली. सरपंच लक्ष्मण पवार यांच्या बाजूने युक्तिवाद करताना अँड. सुशांत प्रभुणे यांनी सदर अविश्वास ठराव हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९७५ च्या तरतुदीशी विसंगत असल्याचे न्यायालयाला सांगितले व प्रथम दर्शनी तसे निदर्शनास आणून दिल्यामुळे मा. उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.