बारामतीत राखी खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज
बारामती : भाऊ – बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन बुधवारी (दि.30 ऑगस्ट) रोजी साजरा होत आहे. यासाठी बारामतीच्याच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. यामध्ये नवनवीन आणि फॅन्सी बनविलेल्या राख्या व गोड खाद्य पदार्थांची दुकाने सजली आहेत
मागच्या वर्षांच्या तुलनेत यंदा राख्यांच्या किमतीत वाढ झाली असली तरी देखील बारामतीत महिलावर्गाचा राखी खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. रक्षाबंधन असल्याने राखी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी पहायला मिळत आहे.
नवनवीन आणि फॅन्सी राख्या खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी बाजारपेठेत झाली असली तरी. नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन येत असते. मात्र, बुधवारी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात झाल्यामुळे, रक्षाबंधन गुरूवारी साजरे होणार आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर कोणताही परिणाम होणार नाही. गुरुवारी संपूर्ण दिवसभर रक्षाबंधनाचा मुहूर्त असल्याची माहिती पंचांग अभ्यास यांनी सांगितले.
