भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील वडिल मुलाचा मृत्यु

बारामती : बारामती वालचंदनगर रस्त्यावर सोनगाव हद्दीत भरधाव हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील वडिल जागीच ठार झाले तर मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
सतीश पवार वय. (३७) मुलगा आर्यन सतीश पवार (वय १३) रा.आसू (ता. फलटण) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. मयत सतीश पवार व मुलगा आर्यन हे दोघे दुचाकी क्र एम एच ११ सी एस ७४७२ वरून (ता.२९) रोजी सकाळी बारामतीच्या दिशेने जात असताना बारामतीकडून भरधाव येणारा हायवा ट्रक क्र एम एच ४२ ए.ओ.८२५५ यांची सोनगाव येथे समोरा समोर धडक झाली.
यामध्ये सतीश पवार हे जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा आर्यन याला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याने आसू परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अनिल पवार यांनी तालुका पोलिस ठाण्यात डी.पी.जगताप आणि कंपनीच्या हायवा ट्रकच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.